spot_img

Yuzvendra chahal : युजवेंद्र चहलचा नवा लव्ह अँगल? शेफाली बग्गासोबत स्पॉट झाल्याने चर्चांना उधाण

spot_img

आरजे महवशसोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान रेस्टॉरंटबाहेर अभिनेत्री शेफाली बग्गासोबत दिसल्याने सोशल मीडियावर फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून मैदानाबाहेरील कारणांमुळे सतत चर्चेत आहे. 2025 मध्ये पत्नी धनश्री वर्मासोबत (Dhanshree Verma) घटस्फोट घेतल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. घटस्फोटानंतर आरजे महवशसोबत (RJ . Mahvesh) चहलला अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते. दोघे परदेशात सुट्टी एन्जॉय करतानाही स्पॉट झाले होते. मात्र, अलीकडेच सोशल मीडियावरील पोस्ट, एकमेकांना अनफॉलो करणे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा जोर धरू लागल्या.

अशातच आता युजवेंद्र चहल पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली बग्गासोबत (Shefali Bagga) तो एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चहल आणि शेफाली एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पापाराझींनी पाहताच शेफालीने चहलपासून थोडे अंतर ठेवत थेट निघून जाणे पसंत केले. तिने कॅमेऱ्यांसमोर पोझ देण्यासही टाळाटाळ केली. यामुळे या भेटीबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

आरजे महवशसोबतच्या नात्याला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा सुरू असतानाच शेफाली बग्गासोबतचा हा स्पॉटिंग प्रकार चहलच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात असल्याचा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप चहल किंवा शेफालीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ