Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : ‘घे आईची शप्पथ..’, या निर्णयावरून युजवेंद चहलचा धनश्रीला टोमणा

spot_img

सुप्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) त्याच्या खेळामुळे नव्हे तर पर्सनल लाईफ,विवाद यांच्यामुळेच जास्त चर्चेत असतो. सध्या त्याची इन्स्टा पोस्टही चर्चेच्या अग्रस्थानी आहे. त्याने या पोस्टमधूनन कथितरित्या त्याच्या पूर्व पत्नीला म्हणजेच धनश्रीला (Dhanshree Verma) टोमणा मारल्याचे बोलले जात आहे. मात्र काही वेळाने त्याने ही पोस्ट डिलीट करून टाकली. त्यावरून चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

आयुष्यात कशीही परिस्थिती आली तरी पुढे चालत राहिलं पाहिजे पण काही लोकांसाठी मूव्ह ऑन करणं तितकं सोपं असतं का असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ शकतं. क्रिकेटर युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) पोस्ट्स आणि टिप्पण्या पाहून तरी असंच म्हणावं लागेल. कारण हा भारतीय क्रिकेटर त्याच्या बॉलिंगपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट्सची नेहमीच चर्चा होत असते. त्यान् नुकत्याच शेअर केलेल्या एका स्टोरीने तर इन्स्टाग्रामवर वादळचं आणलं, त्या पोस्टमधून याने त्याची पूर्व पत्नी म्हणजे धनश्री वर्मा (Dhanshree Verma) हिला खणखणीत टोला लगावल्याच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाल्या. काही वेळापूर्वी युजवेंद्र चहलने दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पत्नी त्यांच्या पतींकडून पोटगी मागू शकत नाहीत.’ असं त्यामध्ये त्याने स्पष्टपणे म्हटलं होतं.

त्याचा इंस्टाग्रामचा स्क्रीनशॉट आपल्या अकाऊंटवर शेअर करताना युजवेंद्रने एक कॅप्शन लिहीली, ती म्हणजे ‘घ्या आईची शपथ, की या निर्णयावरून पलटी मारणार नाही’,असं त्याने लिहीलं. मात्र अवघ्या काही वेळानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली, पण तेवढ्या वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे ऑनलाइन जोरदार वादविवाद सुरू झाला आणि ही पोस्ट धनश्री वर्मावर साधलेला निशाणा होता की कायदेशीर निर्णयाचे समर्थन ? असा सवाल अनेक जण विचारू लागले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ