spot_img

YouTuber Armaan Malik Death Threat : अरमान मलिकच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी !

spot_img

धमकी देणाऱ्यांनी मागितली 1 कोटींची खंडणी

यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी नेहमीच चर्चेत असतात. हेच नाही तर अरमान मलिक, त्याची पहिली पत्नी पायल आणि दुसरी पत्नी कृतिका हे बिग बॉसच्या घरात दाखल झाले होते. त्यादरम्यान त्यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. पायल हिला दोन मुले आणि कृतिकाला एक मुलगा आहे. विशेष म्हणजे सर्वजण आनंदाने एकाच घरात राहतात. मुलांना सांभाळण्यासाठी आणि घरातील इतर कामांसाठी मोठा कामगार वर्ग अरमान मलिककडे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कोट्यावधी कमाई करताना दिसतात. मात्र युट्यूबर अरमान मलिकला (Armaan Malik) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोन करणाऱ्याने 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. त्यानंतर, युट्यूबरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले की, गेल्या 20 दिवसांपासून त्याला सतत धमकीचे फोन येत आहेत. अरमानने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती बाळगून पोलिसांकडून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

बिग बॉस ओटीटी सीजन 3′ मध्ये झळकल्यानंतर अरमान मलिक आणि त्यांच्या दोन पत्नींची वैयक्तिक आयुष्यं नेहमीच चर्चेत राहिली आहेत. आता या धमकी प्रकरणामुळे ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अरमान मलिक यांनी सांगितले की त्यांच्या मुलांना धमक्या मिळत असल्याने ते सर्वात जास्त चिंतित आहे. “पैसा कमी-जास्त होऊ शकतो, पण मुलांचे सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणामुळे अरमान आणि त्यांच्या कुटुंबात तणावाचे वातावरण असून, त्यांना आशा आहे की पोलीस लवकरात लवकर कारवाई करून आरोपींचा शोध घेतील.

अरमान मलिकला फोन करणारा कोणीतरी त्याच्या जवळचा असल्याचा संशय आला. जेव्हा त्याने फोन उचलला नाही तेव्हा त्याची पहिली पत्नी पायलला फोन येऊ लागले. फक्त जवळच्या नातेवाईकांना त्याची पत्नी पायलचा फोन वापरता येतो. त्याने असेही म्हटले की फोन करणाऱ्याने कोणत्याही गुंडांचे नाव घेतले नाही. तो फक्त पैशाची मागणी करत होता. सुरुवातीला त्यांनी 5 कोटी रुपये, नंतर 3 कोटी रुपये आणि आता ते 1 कोटी रुपये मागत आहेत. अरमान मलिक म्हणाला की त्याचे कोणाशीही शत्रुत्व नाही. मात्र, धमक्यांनंतर त्याला त्याच्या मुलांच्या सुरक्षेची भीती वाटते, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ