spot_img

Year Ender : अभिनय, रिअ‍ॅलिटी शो आणि दिग्दर्शनात घडली नवी इतिहासगाथा

spot_img

कमबॅकपासून पदार्पणापर्यंत – 2025 मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारे कलाकार कोण?

2025 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी खास ठरलं आहे. अनेक कलाकारांनी आपल्या कामातून नव्या उंची गाठल्या, तर काहींनी दमदार कमबॅक करत पुन्हा एकदा लोकप्रियतेचा शिखर गाठलं. अभिनय, रिअ‍ॅलिटी शो, चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून या कलाकारांनी प्रेक्षकांवर खोल छाप उमटवली. जाणून घेऊया 2025 मध्ये विशेष चर्चेत राहिलेले कलाकार कोणते आहेत…

अक्षय खन्ना

‘धुरंधर’ (Dhurandhar) या चित्रपटातून अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) दमदार पुनरागमन केलं. रेहमान डकैत या भूमिकेत त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. विशेषतः चित्रपटातील Fa9la या गाण्यावरचा त्याचा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. इन्स्टाग्राम रील्समुळे हे गाणं ट्रेंडमध्ये आलं असून, यामुळे अक्षय खन्नाचा क्रेझ पुन्हा एकदा शिखरावर पोहोचला आहे.

गौरव खन्ना

टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा गौरव खन्नासाठी (Gaurav Khanna) 2025 हे वर्ष सुवर्णकाळ ठरलं. त्याने सलग दोन मोठे रिअ‍ॅलिटी शो जिंकत इतिहास रचला. ‘मास्टरशेफ’चा विजेता ठरण्यानंतर त्याने ‘बिग बॉस 19’ची (Bigg Boss 19) ट्रॉफीही आपल्या नावावर केली. ‘अनुपमा’ मालिकेमुळे आधीच घराघरात पोहोचलेला गौरव यंदा खऱ्या अर्थाने सुपरस्टार ठरला.

अहान पांडे आणि अनीत पड्डा

‘सैयारा’ (Saiyaara) या गाजलेल्या चित्रपटातून पदार्पण करणारे अहान पांडे (Ahaan Pandey) आणि अनीत पड्डा (Aneet Pada) 2025 मधील चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. चंकी पांडेचा पुतण्या असलेला अहान आणि मॉडेलिंग व वेब सीरिजमधून आलेली अनीत – दोघांनीही पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय’सारख्या प्रोजेक्टमुळे ओळख मिळवलेल्या अनीतसाठीही हे वर्ष खास ठरलं.

आर्यन खान

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने (Aryan Khan) 2025 मध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. नेटफ्लिक्सवरील The Bads of Bollywood या वेब सीरिजमधून त्याने दिग्दर्शकीय पदार्पण केलं. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गुपितांवर भाष्य करणाऱ्या या सटायर वेब सीरिजने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या कामासाठी आर्यनला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा पुरस्कारही मिळाला.

गिरिजा ओक

मराठी अभिनेत्री गिरिजा ओक (Girija Oak) एका साध्या पण मोहक लूकमुळे अचानक राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आली. हिंदी यूट्यूब मुलाखतीदरम्यान निळ्या साडीतील तिचा साधेपणा प्रेक्षकांच्या मनाला भावला. सोशल मीडियावर तिचा हा लूक व्हायरल झाला आणि तिला ‘नॅशनल क्रश’ अशी ओळख मिळाली. तिच्या साडी कलेक्शनपासून व्यक्तिमत्त्वापर्यंत सर्वच बाबींची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ