मुकेश भाऊ साळुंके यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांकडून तत्काळ कारवाईचे आश्वासन
उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackkery) पक्षाचे राज्य संघटक तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके ( Mukesh Salunke) यांच्या बरोबर आदिवासी विद्यार्थ्यांनी संपर्क केला व आदिवासी वस्तीगृह येथे स्वच्छता व राहण्याची व्यवस्था नाही म्हणून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके व आदिवासी विद्यार्थ्यांनी यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मा श्री अरुण पवार (Arun Pawar) साहेब यांची भेट घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या व प्रकल्प अधिकारी साहेबांनी आश्वासन दिले कि पुढील तीन चार दिवसांत सर्व व्यवस्था उत्तम होईल असे सांगण्यात आले.




