spot_img

Yavatmal Crime : यवतमाळच्या बेपत्ता चिमुकलीची हत्या; जुन्या वादातून संपवलं

spot_img

यवतमाळ येथे सात वर्षांची शिवानी जाधव ही मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पालकांनी तिच्या हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. अनेक तास उलटूनही मुलगी न सापडल्याने पोलिसांनी सहा विशेष पथके तयार करून शोध अधिक व्यापक केला.

तपासादरम्यान पोलिसांनी गावातील प्रत्येक घराची झडती घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शेजारच्या एका घरातील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने त्या ठिकाणी सखोल तपासणी करण्यात आली. गोठ्याच्या आत असलेल्या खोल्यांपैकी एका खोलीत, पलंगाखाली गोणीत भरलेला मुलीचा मृतदेह आढळून आला.

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, मुलीच्या नाकातील सुमारे दीड ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असल्याचेही समोर आले आहे. प्राथमिक तपासात जुन्या वादातून हा गुन्हा घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ