spot_img

Women Day 2026 : महिलांच्या आयुष्यावर आधारित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी चित्रपट 6 मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

spot_img

महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या ‘तिघी’ चित्रपटातून स्त्रीमनाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे.

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी विणलेला चित्रपट येत्या महिला दिनी म्हणजेच 6 मार्च 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई-मुलींच्या नात्यात दडलेल्या न सांगितलेल्या भावना, आठवणी आणि काही अंतर्मुख करणाऱ्या क्षणांवर आधारित ही कथा आहे. ‘तिघींच्या जगण्यातलं चौथं पान’ उलगडत असताना या तिघींमधलं , त्यांचे आयुष्याकडे पाहाण्याचे दृष्टिकोन आणि बदलत्या काळातली भावनिक चढ-उतार यांचा सुंदर वेध दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनी घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासह नेहा पेंडसे (Neha Pendse) बायस व सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) या चित्रपटात दिसणार आहेत.

दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “‘तिघी’ हा आई-मुलींच्या नात्याचा चित्रपट असून त्यांच्या आतल्या आवाजांचा प्रवास आहे. आपण ज्या भावना दैनंदिन आयुष्यात व्यक्त करू शकत नाही, त्या सगळ्या या कथेतून उलगडतात. येत्या महिला दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.’’ सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन पुन्हा एकदा एकत्र आल्याने प्रेक्षकांना काहीतरी भावस्पर्शा कलाकृती पाहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ