spot_img

Women Health : मासिक पाळीतील त्रास कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटचा गोड उपाय

spot_img

पोटदुखी, मूड स्विंग्स आणि थकवा कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर ठरू शकते

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना पोटदुखी, पाठदुखी, थकवा, चिडचिड आणि मूड स्विंग्ससारख्या समस्या भेडसावतात, ज्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम होतो. अशा वेळी घरच्या घरी सहज मिळणारे डार्क चॉकलेट काही प्रमाणात आराम देऊ शकते.

डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स सारखी पोषक घटक असल्यामुळे ते पोटदुखी, स्नायूंवरील ताण, थकवा, अंगदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. मॅग्नेशियम स्नायूंना आराम देते, लोह रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी टिकवतो आणि अँटीऑक्सिडंट्स दाह कमी करतात.

मूड स्विंग्स आणि चिडचिड कमी करण्यास डार्क चॉकलेट उपयोगी ठरतो कारण त्यामुळे ‘फील गुड’ हार्मोन्सची पातळी वाढते. तसेच गोड पदार्थ खाण्याची इच्छा नियंत्रणात राहते कारण डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि कोको जास्त असते.

तणाव आणि अस्वस्थता कमी करण्यासाठीही डार्क चॉकलेट मदत करते; त्यातील खनिजे मज्जासंस्थेला शांत ठेवतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारतात.

तरीही याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. जास्त खाल्ले तर आम्लपित्त, डोकेदुखी किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो. 70% किंवा त्याहून जास्त कोको असलेले डार्क चॉकलेट कमी प्रमाणात घेणे योग्य ठरते. योग्य प्रमाणात डार्क चॉकलेटचा समावेश मासिक पाळीतील अनेक सामान्य त्रासांवर आराम देणारा पर्याय ठरतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ