spot_img

Astrology : Gen Z पिढी का होते ‘astro apps’ साठी क्रेझी ?

spot_img

आजकालच्या जेंझी (Gen Z ) पिढीच आयुष्य अत्यंत तणावग्रस्त आणि डिजिटल जगाशी जोडला गेलं आहे. शिक्षण असो किंवा कोणतही क्षेत्र असो डिजिटॅलिसशन हि काळाची गरज बनली आहे. पण या सगळ्या धावपळीमुळे माणसाच्या जीवनात मानसिकतानाव वाढत चालला आहे. लोक धार्मिक आणि पारंपरिक गोष्टींसाठी लवकर वेळ न घालवता मोबाईलवरच आध्यात्मिक मार्गदर्शन शोधतात.

आठवड्यातून एकदा पुजाऐवजी Gen Z ला दररोज 5 मिनिटांचं माइंड केअर (mind care) महत्त्वाचं वाटतं. तणावग्रस्त आयुष्याला आणि मनाला संतुलन राखण्यासाठी ते अ‍ॅस्ट्रो अ‍ॅप्सवर राशीभविष्य, दुपारी मेडिटेशन टिप्स, रात्री रिलेशनशिप सल्ला, असं काहींना काही सर्च करत ‘मायक्रो हीलिंग’ करत राहतात. यामुळे मानसिक संतुलन आणि स्वतःची समज वाढते. त्याबरोबरच एकत्रित कुटुंब पद्धती नसल्याने कुटुंबात संवाद कमी होतो ज्यामुळे त्यांना अशा अ‍ॅप्सचा आधार घ्यावा लागतो. मनातल्या भावना बोलायला, ऐक्याला कोणी नसल्याने ते मोबाईलवरच ऐकून घेणारी आणि समजून घेणारी जागा शोधतात. त्यामुळे आध्यात्मिक अ‍ॅप्स त्यांना भावनिक सुरक्षितता देतात.

सोशल मीडियावर सगळं परफेक्ट दिसत असलं तरी मनातलं सांगायला भीती, असुरक्षितता वाटते. काही प्रश्नांची आपल्याला उत्तर सापडत नाहीत आणि काही प्रश्न मांडण्यासाठी आपण लाजतो त्यामुळे अ‍ॅस्ट्रो अ‍ॅप्समध्ये गुप्तता राखत खरी समस्या शेअर करता येते. तरुणांना न जज, मनात कोणतीही भीती न बाळगता मनातलं समजून घेणारा “डिजिटल मित्र” इथे मिळतो. असं त्यांचं मत आहे. भारतीय संस्कृतीत अध्यात्म आधीपासूनच आहे. आज फक्त त्याचा चेहरा बदलला आहे आणि त्याची पद्धत बदली आहे. वेळ वाचवण्यासाठी व लोकांना सुखकर होण्यासाठी या अँप्सचा शोध लावला असावा. पूर्वी मंदिरातील गुरूंजीकडे लोक प्रश्न विचारायची आणि आत्ता या अँप्सवर विचारतात.

तंत्रज्ञानातं विकास झाल्याने लोकांची देखील प्रगती होत आहे. या धावपळीच्या काळात आपण आध्यात्मापासून दुरावले जात आहोत तर हे अँप्स आपल्या कुठे तरी आध्यात्माच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अ‍ॅस्ट्रो अ‍ॅप्स अधिक वैयक्तिक मार्गदर्शन देत आहेत ज्यामुळे लोकांना विश्वास बसतो. AI मुळे व्यक्तीच्या भावनांनुसार उपाय आणि लाइफ गाइडन्स मिळते. त्यामुळे हा डिजिटल अध्यात्माचा ट्रेंड इतर पिढ्यांनाही आकर्षित करणार हे निश्चित.

Gen Z पिढी तंत्रज्ञानामुळे दूर जात नाही, तर त्याचा उपयोग स्वतःशी जोडण्यासाठी करते. अ‍ॅस्ट्रो अ‍ॅप्स त्यांच्या दैनंदिन भावनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ