spot_img

White City : पांढऱ्या संगमरवरी रंगात न्हालेली राजधानी! ‘व्हाईट मार्बल सिटी’ अश्गाबातची अनोखी ओळख

spot_img

इमारतींपासून गाड्यांपर्यंत सर्व काही पांढरंच; गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद आणि कडक नियमांनी वेगळीच जीवनशैली

जगभरात अनेक शहरे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीमुळे प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात. हे शहर संपूर्ण जगात ‘व्हाईट मार्बल सिटी’ म्हणून ओळखले जाते. कारण येथे नजर जाईल तिथे फक्त पांढऱ्या संगमरवरी रंगाचाच झगमगाट दिसतो.

अश्गाबातमधील बहुतेक इमारती, प्रशासकीय कार्यालये, स्मारके आणि अगदी रस्तेसुद्धा चमकदार पांढऱ्या मार्बलने सजवलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पांढऱ्या मार्बलचा वापर केल्यामुळे या शहराची नोंद थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हीच गोष्ट अश्गाबातला इतर शहरांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवते.

या शहरातील आणखी एक आगळावेगळा नियम म्हणजे वाहनांचा रंग. अश्गाबातमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्या गाड्यांनाच परवानगी आहे. कुणीही दुसऱ्या रंगाची कार घेऊन आल्यास ती जप्त केली जाते आणि संबंधित वाहनमालकाला दंडही भरावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पांढऱ्या गाड्यांचीच रांग दिसते.

पांढऱ्या रंगाचा नियम कधी आणि का?

हा नियम 2018 पासून लागू करण्यात आला. त्या काळातील राष्ट्राध्यक्ष गुरबांगुली बर्दीमुखामेदोव यांना पांढरा रंग विशेष प्रिय होता, असे सांगितले जाते. ते मूळचे दंतवैद्य असल्याने स्वच्छता आणि पांढऱ्या रंगाशी त्यांचा जवळचा संबंध होता. याच कारणामुळे शहरातील जाहिराती, सार्वजनिक सजावट आणि अनेक संरचना पांढऱ्याच रंगात ठेवण्यात आल्या.

2000 नंतर अश्गाबातचे मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे काम करण्यात आले. संपूर्ण शहर पांढऱ्या रंगात असल्यामुळे सूर्यकिरण मोठ्या प्रमाणात परावर्तित होतात. त्यामुळे हवामान ढगाळ असलं तरीही नागरिकांना सनग्लासेस वापरणं अनेकदा आवश्यक ठरतं. अश्गाबात ही केवळ राजधानी नाही, तर रंग, नियम आणि रचनेमुळे जगातली सर्वात वेगळी शहरेपैकी एक म्हणून ओळखली जाते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ