५ जून रोजी का साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन?
आपण जन्माला आल्यापासून ते मरणापर्यंत ही पृथ्वी आपले संगोपन करते.
निसर्ग पोषक, प्रेमळ आणि आलिंगन देणारा आहे.
हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
स्वीडनमधील स्टॉकहोम येथे ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद झाली.
या दिवसाचे औचित्य साधून १९७३ मध्ये जगाने आपला पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी याच दिवशी हा विशेष दिवस साजरा केला जातो.
दरवर्षी, जागतिक पर्यावरण दिन एक विशिष्ट थीम सह साजरा केला जातो.
यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे- जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण.
'अजीब दास्तान हैं ये...' प्राजक्ता कोळीचं खास रेट्रो फोटोशूट
Check It Out