हवेत वाढणारे प्रदूषण कण आणि कमी होणाऱ्या तापमानामुळे हिवाळ्याच्या दिवसात अस्थमाच्या रूग्णांचा त्रास अधिक बळावतो
वर्ल्ड अस्थमा फाउंडेशनच्या मते, भारतातील 25 टक्के लोकसंख्येला प्रदूषणाची एलर्जी आहे. यापैकी पाच टक्के लोकांना होणाऱ्या ऍलर्जीचे रूपांतर दम्यामध्ये होते.
थंडीच्या दिवसात थंड आणि कोरडे वारे वाहतात. अशा परिस्थितीत जुन्या रुग्णांमध्ये दम्याचा झटका येण्याचा धोका अधिक वाढतो.
हिवाळ्यात श्वासोच्छवासाच्या नळ्या आखडतात,याने दमा आणि श्वसनाच्या इतर समस्यांनी ग्रस्त लोकांचा त्रास वाढू लागतो.
थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीजवळ बसणे टाळावे , कारण त्यातून निघणारा धूर फुफ्फुसांसाठी धोकादायक ठरू शकतो.
प्राणायाम करणे हे दम्याच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, त्याच्या नियमित सरावाने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
चहा, कॉफी, सूप आणि इतर प्रकारचे गरम द्रव पेय प्यायल्याने शरीरात उष्णता तर राहतेच, पण कफची समस्याही दूर होते. श्वास घेणे आरामदायी होते.
हिवाळ्यात शक्यतो धूळ आणि मातीच्या संपर्कात येणं टाळा.
निवडणुकीत मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. पण तुम्हाला या मागील कारण माहित आहे का ?