पक्ष फुटला, चिन्हही गेले पण आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळात!

लोक जनशक्ती पक्षाचे  (कै. रामविलास पासवान ) राष्ट्रीय अध्यक्ष यांचे पुत्र चिराग पासवान वारसा पुढे नेत आहेत

बिहारच्या राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून रामविलास पासवान यांची ओळख आहे.

चिराग पासवान यांनी राजकारणात येण्यापूर्वी बॉलीवूडमध्ये काम केलं असून 'मिले ना मिले हम' या चित्रपटात कंगना राणौतसोबत स्क्रीन शेअर केली  

२०२० मध्ये रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर पक्ष आणि पक्षाचे चिन्ह (बंगला) पशुपती पारस यांना मिळाले.

त्यानंतर,चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) स्थापन केला आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चिराग यांनी आरजेडीच्या शिवचंद्र राम यांचा १ लाख ७० हजार १०५ मतांनी पराभव केला.

हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले चिराग पासवान यांनी रविवारी (९ जून) दिल्लीतील राष्ट्रपती भवनात मंत्रीपदाची शपथ घेतली.

चिराग पासवान यांना केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रीपदही मिळाले आहे.

सुशांतच्या मृत्यूला 4 वर्ष पूर्ण, बहीण म्हणाली, ‘तुझा मृत्यू एक रहस्य आणि…’

Check It Out