२६ नोव्हेंबर २००८ ला नेमकं काय घडलं होतं?

२६ नोव्हेंबर २००८ च्या त्या रात्री सुरू झालेल्या आतंकवादी हल्ल्याने मुंबई हादरली होती.

सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी ६० तासांहून अधिक वेळ लागला. पण त्या रात्री नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊ...

लिओपोल्ड कॅफे

अधिकृत आकडेवारीनुसार, लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण मृत्युमुखी पडले होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वे स्थानक नेहमीच लोकांनी गजबजलेलं असतं.येथे झालेल्या गोळीबारात ५८ लोक मृत्युमुखी पडले होते.

ओबेरॉय हॉटेल

असं म्हटलं जातं की, त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास ३५० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना डांबून ठेवलं होतं.

ताज हॉटेल

गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेलं हे ताज हॉटेल परदेशी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.सरकारी आकडेवारीनुसार, हॉटेल ताजमध्ये एकूण ३१ लोक मृत्यमुखी पडले.

कामा हॉस्पिटल

 १८८० साली बांधण्यात आलेल्या या कामा हॉस्पिटलबाहेर झालेल्या चकमकीत दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले.

नरिमन हाऊस

नरिमन हाऊस इमारत ज्यू पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. इथं झालेल्या हल्ल्यात  सहा ज्यू लोक मारले गेले.

मुंबई शहरावर झालेल्या या हल्ल्यानंतर आजही मुंबई तेवढ्याच  वेगाने धावते 

राज्यातील आमदारांना कोणकोणत्या सवलती मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का ?