भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा आज वाढदिवस
क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबई येथे झाला.
सचिन यांची बालपणातील मेहनत, जिद्द आणि समर्पण यामुळेच पुढे ते जागतिक दर्जाचे महान फलंदाज बनले.
सचिन तेंडुलकर यांचा जन्म मुंबईमधील एका मराठा ब्राह्मण परिवारात झाला.
त्यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे होते. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी लेखक होते, त्यांची आई रजनी ही एका विमा कंपनीमध्ये कामाला होती.
सचिन तेंडुलकर यांना दोन भाऊ व एक बहीण होते, चारही भावंडांमध्ये मध्ये सचिन तेंडुलकर हे सर्वात लहान होते.
15 वर्षाच्या वयात सचिनची निवड मुंबई क्रिकेट संघात करण्यात आली. 1988 मध्ये त्यांनी गुजरात विरुद्ध नाबाद शतक पूर्ण केले.
क्रिकेटमधील महान कामगिरीबद्दल सचिन तेंडुलकर यांना अनेक पुरस्कार देण्यात आले.
“क्रिकेटचा देव” म्हणून ओळख मिळवत कोट्यवधी भारतीयांच्या अभिमान बनला.
क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट उपलब्धतेसाठी भारत सरकार द्वारा त्यांना अर्जुन पुरस्कार पुरस्कार देण्यात आला.