अभिनेता शाहिद कपूरचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त चला जाणून घेऊया त्याने केलेला संघर्ष...
शाहिदचा जन्म नवी दिल्लीत अभिनेता पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांच्या घरी झाला.
३ वर्षांचा असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यावर शाहिद कपूर आईसोबत राहिला.
शाहिदने मुंबईत अभिनय आणि नृत्याचे प्रशिक्षण घेतले
सुरुवातीला अनेक चित्रपटात नाकारल्यानंतर, त्याने 'इश्क विश्क' द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
इश्क विश्क साठी त्याला 'फिल्मफेर बेस्ट मेल डेब्यू' पुरस्कार मिळाला.
'विवाह', 'जब वी मेट', 'कमिने', 'हैदर', 'उडता पंजाब', 'पद्मावत' आणि 'कबीर सिंग' हे त्याचे काही महत्त्वाचे चित्रपट आहेत.
शाहिदला अभिनय क्षेत्रात 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखले जाते
शाहिदला 'हैदर' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि 'उडता पंजाब' साठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) पुरस्कार मिळाला आहे.
७ जुलै २०१५ रोजी शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले. त्यांना मीशा आणि झैन ही दोन मुले आहेत.