हिवाळ्यात होणारा घस्याचा त्रास.चला जाणून घेऊया हिवाळ्यात घस्याचा त्रास का बळावतो
संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आपल्याला घशाचा आजार होण्याची शक्यता असते.
हवा बदलली की व्हायरल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते
लहान मुले, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती आणि वयस्कर व्यक्तींना याचा जास्त प्रमाणात त्रास होतो.
व्हायरल इन्फेक्शनची सुरुवात ही साधारणपणे घसा खवखवण्यापासून होते. मग हळूहळू सर्दी होणे, डोकेदुखी, ताप, कफ यांसारखी लक्षणे दिसतात.
हे रोकण्यासाठी घरच्या घरी घशाला आराम देणारे विविध चहाचे प्रकार जसे कि तुळशीचा चहा,मेथ्या घालून चहा,आलं-मिंट चहा,ज्येष्ठमधाचा चहा करता येतील.
दिवसातून २ ते ३ वेळा हळद आणि मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या केल्याने घसा बरा होण्यासाठी मदत होते.