अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दोघांनी एकत्र एण्ट्री केली, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. 

आता ताराने वीरसोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

एकमेकांना मिठी मारतानाचे, किस करतानाचे त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. 'स्काय फोर्स' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

'काल रात्री माझ्या फटाक्यासोबत..' असं मजेशीर कॅप्शन देत ताराने हे फोटो पोस्ट केले आहेत.

चाहत्यांनी तारा आणि वीरच्या जोडीवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तर तुम्हाला कसा वाटला तारा आणि वीरचा हा नवा लुक हे आम्हाला नक्की कळवा

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.