१२ एप्रिल रोजी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे
विविध भाषेतून तब्बल १२ हजार गाणी गाणारी सुरांची मल्लिका काळाच्या पडद्याआड गेली
आशाताईंच्या निधनाने बॉलिवूडच नाही तर संगीत क्षेत्र एका महान गायिकेला मुकला आहे
आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई यांचं खासगी आयुष्य मात्र संघर्षमयी होतं
सांगलीतील सुप्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी ८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्म झाला होता
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी आशा भोसले यांनी गायनास सुरुवात केली
शास्त्रीय संगीतापासून ते कॅबरे आणि पॉपपर्यंत, आशाताईंनी प्रत्येक प्रकारची गाणी गायली
आशा भोसले यांचे आयुष्य कठीण प्रसंगांना तोंड देत संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठण्याचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे
वयाच्या १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह करून घर सोडले, मात्र संसार संघर्षाचा ठरला
पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर, ४७ व्या वर्षी त्यांनी प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले
१२ एप्रिल २०२६ रोजी, वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले