मुख्यमंत्री नाही. ते सध्या सत्तेतही नाही. तरीही जेव्हा ते बोलतो, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र थांबून ऐकतो.
त्यांच्या सभेतला एक वाक्यांश सोशल मीडिया वर वादळ उठवतो, एक भाषण राजकीय चर्चेची दिशा बदलतं, आणि एक प्रश्न व्यवस्थेला अस्वस्थ करतो
14 जून 1968,मुंबईच्या शिवाजी पार्क जवळील एका मराठी कायस्थ कुटुंबात जन्माला आलेल्या एका मुलाचे नाव स्वराज ठाकरे असे ठेवल गेल.
पुढे हाच स्वराज महाराष्ट्राच्या राजकारणात’राज ठाकरे’ या नावाने ओळखला जाऊ लागला.
त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धाकटे बंधु, तर आई कुंदा केशव ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्या लहान बहीण.
राज ठाकरे यांचे शालेय शिक्षण बालमोह विद्या मंदिर,दादर येथे झाले.
पुढे त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून त्यांनी पदवी घेतली.
ते जर राजकरणात आले नसते तर काय केले असते ?असा प्रश्न विचारल्यावर त्यांचा एक उत्तर दिले.”कॉलेज च्या काळात मला वाल्ट डिज्नी स्टुडिओसाठी काम करायच होत.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)या नव्या पक्षाची स्थापना 9 मार्च 2006 रोजी केली.
मराठी माणसं आणि त्यांचा हक्क हा पक्षाचा केंद्रबिंदू होता. अनेक अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभ राहुन राज ठाकरे यांची साथ दिली.