जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी; दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा चेहरा म्हणजे जसप्रीत बुमराह. सध्या बुमराह ट्वेंटी-२० विश्वचषक खेळत आहे.
सामन्यानंतर बुमराहची पत्नी संजना गणेसनने जसप्रीतशी एक स्पोर्ट्स अँकर म्हणून संवाद साधला.
२०१२ मध्ये संजना गणेसनने फेमिना मिस इंडिया स्टाइल दिवा स्पर्धेत भाग घेतला आणि अंतिम फेरी गाठली. येथूनच तिची कारकीर्द सुरू झाली.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेसनची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती.
संजनाने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली होती. या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली, परंतु त्यानंतर बराच वेळ त्यांच्यात बोलणे झाले नाही.
लग्नाआधी जसप्रीत आणि संजना दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते.
२०२१ मध्ये जसप्रीत बुमराहला वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी पहिल्यांदाच समोर आली होती.
लग्नानंतर दोघांनी एकत्र फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली.