उन्हाळा हा मुलांसाठी आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण करतो. कारण कडक उन्हाळ्यात लहान मुलांच्या शरीरातील पाणी लवकर कमी होते
अशा परिस्थितीत आपल्या मुलांच्या खाण्यापिण्यातील थोडासा निष्काळजीपणासुद्धा एक मोठी समस्या बनू शकतो.
अनेकदा पालक नकळतपणे आपल्या मुलांना असे पदार्थ खाऊ घालतात जे उन्हाळ्यात त्यांच्यासाठी हानिकारक ठरतात.
त्यामुळे या ऋतूत मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आणि काही विशिष्ट पदार्थ खायला न देणे महत्त्वाचे आहे.
कारण या कडक उन्हात मुलांच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे डिहायड्रेशन, पोटाचे विकार आणि थकवा जाणवू लागतो त्यामुळे पालकांनी थोडं जास्त सतर्क राहणं गरजेचं असत.
उन्हाळ्यात मुलांना जास्त थंड पेय, जंक फूड, पॅकेज्ड ज्यूस आणि बाहेरचे तळलेले पदार्थ देणं टाळा त्याऐवजी त्यांना ताजे फळं, घरचे बनवलेले पदार्थ आणि भरपूर पाणी द्या.
उन्हाळ्यात मुलांसाठी ताजे, रसाळ फळं खूप फायदेशीर असतात. कलिंगड, खरबूज, आंबा, द्राक्षं, संत्री यांसारखी फळं शरीराला पाणी देतात आणि एनर्जीही टिकवून ठेवतात.
त्यामुळे रोजच्या आहारात किमान एक-दोन फळांचा समावेश नक्की करा.बाजारातील थंड पेयांऐवजी घरचे लिंबूपाणी, नारळपाणी, बेल सरबत किंवा आम पन्हे द्या.
नैसर्गिक पेय मुलांना हायड्रेट ठेवतात आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात.