लसूण हे एक औषधी आणि चवदार कंदमूळ आहे, ज्याचे रोजच्या आहारात सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे फायदेशीर मानले जाते, कारण यामुळे रक्तदाब कमी होतो, सर्दी-खोकला दूर होतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. 

चला तर जाणून घेऊया लसूण खाण्याचे मुख्य फायदे...

लसणामुळे हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

 लसणातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला आणि घशाच्या समस्यांवर हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

 लसणातील सल्फ्यूरिक संयुगे रक्तवाहिन्या रुंद करतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.

 नियमित लसूण सेवनामुळे कोलन कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

 रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

लसणाचे तेल किंवा लसूण खाल्ल्याने संधिवात आणि सांधेदुखीच्या त्रासात आराम मिळतो

हिवाळ्यात होणारा घस्याचा त्रास.चला जाणून घेऊया हिवाळ्यात घस्याचा त्रास का बळावतो