सिद्धार्थ-मितालीने ‘या’
जगप्रसिद्ध वास्तूला दिली भेट
अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दरवर्षी एक फॉरेन ट्रीप करतात.
यंदा सिद्धार्थ आणि मिताली इटलीमध्ये मजामस्ती करत आहेत.
नुकतंच मितालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही नवे फोटो शेअर केले आहेत.
दोघांनी एका आयकॉनिक वास्तुला भेट दिली.
जगप्रसिद्ध ‘हॅरी पॉटर’ या चित्रपट मालिकेमध्ये दाखवण्यात आलेली इमारत तिने प्रत्यक्षात पाहिली.
मितालीने तिच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “लोक म्हणतात ही इमारत एखाद्या डिस्ने कॅसलसारखी दिसते.
मी म्हणते ती हॉगवार्ट्ससारखी दिसते.”
‘हॅरी पॉटर’ ही मालिका आणि ही इमारत नक्कीच अनेकांच्या मनात घर करून आहे.
ती प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी पाहणे म्हणजे पर्वणीच!
नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रचला इतिहास
CHECK IT OUT