संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटात!  पाहा मनमोहक छायाचित्रे

यंदाच्या आषाढी एकादशीला काहीच दिवस शिल्लक आहेत.

विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या वारकऱ्यांचा मेळा काल (२जुलै) दिवे घाटात पोहोचला तेव्हाची ही सर्व छायाचित्रे आहेत.

पुण्यातला मुक्काम आटोपून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अवघड असा दिवे घाट पार करून सासवडमध्ये दोन दिवसीय मुक्काम करणार आहे.

जवळपास चार किलोमीटर लांबीच्या अवघड दिवे घाटात वारकऱ्यांनी माऊली माऊली असा महागजर केला.

हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली माऊली अशा अखंड नामघोषाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने दिवे घाट लीलया पार केला.

टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या घोषात वारकऱ्यांनी वारीचा हा प्रवास सुरु केला आहे.

प्रिया बापटचे लंडन ट्रिपचे फोटो चर्चेत

Check It Out