चित्रपटसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जी मुख्यतः साऊथ चित्रपटसृष्टीत काम करत असली तरी तिचा चाहतावर्ग संपूर्ण भारतात आहे.

समांथाने तिच्या अभिनय आणि सौंदर्यानं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. 

कोणीही गॉडफादर नसताना आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि आज ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

ही अभिनेत्री म्हणजे समांथा रुथ प्रभू. समांथा आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी.

समांथा प्रभू ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जिने तेलगु, तामिळ आणि हिंदी चित्रपटातही खूप नाव कमावलं आहे. 

समांथाला तिच्या कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

समांथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी केरळच्या अलाप्पुझामध्ये झाला.

समांथाचं संगोपन चेन्नईजवळच्या पल्लवरम इथं झालं. पुढे ती अस्खलित तमिळ भाषा शिकली.

समांथाचं शालेय शिक्षण होली एंजल्स अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूलमध्ये झालं. 

पुढे समांथाने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. पदवीच्या शेवटी तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती.

समांथाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये गौतम वासूदेव मेनन यांचा तेलगु चित्रपट 'ये माया चेसावे' या चित्रपटातून केली होती.

 ये माया चेसावेने तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार, तसंच प्रतिष्ठित नंदी पुरस्कार मिळवून दिला.

 त्यानंतर 'पुष्पा' चित्रपटातील सामंथा रुथ प्रभूचे 'ऊ अंटावा' हे गाणे प्रचंड गाजले.

 भारताला नजरेतून टिपणारा अद्वितीय अवलिया काळाच्या पडद्याआड...