रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा विवाह सोहळा संपन्न
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात रंगली आहे.
26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रश्मिका मंदाना कर्नाटकातील कोडवा आणि विजय देवरकोंडा तेलुगू हिंदू कुटुंबातून येतात. यामुळे सकाळी तेलुगू आणि संध्याकाळी कोडवा रितीरिवाजानुसार विधी पार पडले.
या लग्नसोहळ्याचे फोटो रश्मिका आणि विजयने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पारपंरिक दाक्षिणात्य पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला आणि त्यानुसारच या दोघांचा पोशाख होता.
सहसा लग्नसोहळ्यात वधूवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. परंतु यावेळी पण तिच्यापेक्षाही जास्त कौतुक विजयच्या लूकचं झालं.
हातावर आल्ता, भरजरी दागिने, कमरपट्टा, बाजूबंद.. अशा अत्यंत पारंपरिक अंदाजात विजय दिसून आला. त्याने धोती आणि त्यावर शॉल परिधान केला होता.
लाल रंगाची साडी, गळ्यात सोन्याच्या माळा- हार, बाजूबंद, कमरपट्टा, हातात पारंपरिक बांगड्या या लूकमध्ये रश्मिका अगदी राणीसारखी दिसत होती
विजय आणि रश्मिका यांच्या या पारंपरिक लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी काम केलंय.