आरारा खतरनाक!  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडेंची ‘खलनायक’ म्हणून एन्ट्री

‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ अशा चित्रपटांची नावं जरी घेतली तरी पहिल्या व्यक्तीचं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे प्रवीण तरडे.

मराठीसह हिंदी कलाविश्वात त्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटला आहे.

 रंगभूमीपासून त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली.

मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यावर आता लवकरच हे हरहुन्नरी अभिनेते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

प्रवीण तरडेंनी त्यांच्या ‘खतरनाक’ दाक्षिणात्य एन्ट्रीची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.

प्रवीण तरडे मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘अहो विक्रमार्का’ असं आहे. 

 ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील अभिनेत्रीचा गुलाबी रंगाच्या इरकल साडीतील लूक