पती ऑस्ट्रेलियात,
तर पूजा सावंतने भारतात
साजरी केली पहिली वटपौर्णिमा!
पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला दरवर्षी वटपौर्णिमेचा सण साजरा करतात.
पूजाचा नवरा जरी ऑस्ट्रेलियात असला तरीही अभिनेत्रीने तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली भारतात.
पूजा सावंतने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
वटपौर्णिमेनिमित्त पूजाने पिवळ्या व त्याला लाल रंगाचा काठ असलेली सुंदर अशी साडी नेसली होती.
नाकात नथ, हातात हिरवा चुडा, गळ्यात सुंदर ठुशी आणि उठून दिसणार मंगळसूत्र परिधान केलं.
वटपौर्णिमेच्या फोटोंना अभिनेत्रीने “पहिली वटपौर्णिमा सिद्धेश मिस यू” असं कॅप्शन दिलं आहे.
‘आंतरराष्ट्रीय योग दिन’
२१ जून रोजीच का साजरा करतात?
Check It Out