पंतप्रधान मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री शिंदेंनी केली महापूजा तर उपमुख्यमंत्री फडणवीस वारकऱ्यांसह दिसले!

आज राज्यात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्नीक पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आषाढी एकादशीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे वारकऱ्यांसह सहभाग नोंदवला.

उपमुख्यमंत्र्यांचा आणखीन एक फोटो, यामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर सहकारीही दिसत आहेत.

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे सपत्नीक पूजा करताना.

आषाढी एकादशीचा उपवास करताय?  मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा