यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई फिरण्याचा प्लॅन करताय? ‘या’ अप्रतिम स्थळांना नक्की भेट द्या

'स्वप्नांचं शहर' म्हणून ओळखली जाणारी 'मुंबई' महाराष्ट्राची राजधानी आहे. 

सुट्टीत सवड काढून राज्यातून अनेकजण मुंबई फिरण्यासाठी येतात. मात्र, यावेळी मुंबईत नेमकं कोणत्या ठिकाणी जायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

तुम्हाला जर प्राणी, पक्षी आणि जगाच्या सहा खंडांमधील विविध प्रकारची झाडं पाहायची असतील तर जिजामाता उद्यान भायखळा हा उत्तम पर्याय आहे.

 तुम्हाला जुनी मुंबई आणि मुंबईचा इतिहास जवळून पाहायचा असेल तर भाऊ दाजी लाड संग्रहालय उत्तम पर्याय आहे.

तुम्हाला जर गड किल्ले पाहण्याची आवड असेल तर मुंबईतील 'वरळीचा किल्ला' हा एक उत्तम पर्याय आहे.

 मलबार हिल म्हणजे मलबार टेकडीच्या माथ्यावर असलेली गार्डन म्हणजेच हँगिंग गार्डन. हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अर्थात ज्याचं मूळ नावं होतं 'प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम'हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीर हायड्रेटेड (थंड) ठेवण्यासाठी खालील फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे