पुरातन विष्णू मुर्ती, पादुका अन्…; पंढरीच्या विठ्ठल मंदिरात आढळलेल्या वस्तूंचे फोटो आले समोर
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असताना इथे एक तळघर आढळून आले
या खोलीत विष्णूच्या दोन, महिषासुरमर्दिनी, तसेच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती आढळून आल्या
मूर्ती साधारणपणे सोळाव्या शतकातील असणार असा अंदाज पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी व्यक्त केला आहे
विठ्ठलाच्या मंदिरात सापडलेलं तळघर पाच फूट x पाच फुटांचे असून, उंची सहा फूट आहे
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन कामामुळे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे लांबून दर्शन सुरू आहे
काम अंतिम टप्प्यात असून, रविवारी (दि. २) विठ्ठलाचे पदस्पर्श म्हणजेच देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन सुरू होणार आहे.
तरुणांमध्ये वाढत्या तणावाची ही आहे मोठी समस्या
Check It Out