‘पारू’ फेम अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला होता मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणे वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे

काल (३ मे) शरयूने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लग्न झाल्याचा खुलासा केला

शरयूने काल लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर केले; जे सध्या तुफान व्हायरल होतं आहेत

गेल्या वर्षी शरयूने  ‘पिंकीचा विजय असो’ मालिका सोडल्यानंतर साखरपुडा झाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती

१९ सप्टेंबर २०२३ला अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते त्यामुळे शरयूचा फक्त साखरपुडा झाल्याचं सगळ्यांना माहित होतं

शरयू प्रसिद्ध फिल्ममेकर, निर्माता जयंत लाडेबरोबर ३ एप्रिल २०२३रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं

अभिनेत्रीने लग्नाचा खुलासा केल्यामुळे सध्या इतर कलाकारांसह चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण