थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा   फुले यांच्या जयंती निमित्त टाकूया  त्यांच्या जीवन प्रवासावर एक नजर...

महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव  जोतीराव गोविंदराव फुले.यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी  पुणे येथे झाला.

महात्मा फुले हे मराठी   लेखक, विचारवंत आणि  समाजसुधारक होते.

त्यांना महात्मा फुले आणि "जोतिबा फुले" म्हणूनही ओळखले जाते.

गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी जोतिबांनी १८७३ मध्ये'सत्यशोधक समाज' ची  स्थापना केली.

त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य  महिलांना शिक्षण देण्यास आणि त्यांना हक्कांची जाणीव करून  देण्यात घालवले.

शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.

१८८३ मध्ये, स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्यासाठी, त्यांना तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने "स्त्री शिक्षणाचे जनक" म्हणून गौरवले.

 २८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी पुणे येथे  त्यांचे निधन झाले.

२६ नोव्हेंबर २००८ ला नेमकं काय घडलं होतं?