२० तारखेला महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने मतदान झाले.पण तुम्हाला माहिती आहे का लोकशाही म्हणजे काय ?

जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारताची  ख्याती आहे.

लोकशाही म्हणजे, प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य.

लोकशाही हा ‘डेमॉक्रसी’ या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द.

डिमॉस (Demos) म्हणजे सामान्य लोक आणि क्रसी (Cracy) म्हणजे सत्ता. 

मतदानासाठी पात्र असलेल्या सर्व भारतीयांना मतदानाचा हक्क बजावण्याची आणि राजकीय प्रक्रियेत भाग घेण्याची  संधी असते. 

लोकशाहीमध्ये १८ वर्षांवरील सर्व भारतीय नागरिकांना भारतीय संविधानानुसार मतदान करण्याचा अधिकार आहे.

निवडणूकीतील मतदारांच्या जास्तीत जास्त सहभागानेच भारतातील लोकशाही ही अधिकाधिक बळकट होते आहे.

निवडणुकीत मतदान केल्यावर बोटावर 'निळी शाई' का लावली जाते असा प्रश्न तुम्हाला ही पडतो का?