पहिल्यांदाच ‘नॅशनल जिजू’ टॅग मिळाल्यावर निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनास परदेशातच नाही तर भारतातही अतिशय लोकप्रिय आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी २०१८ मध्ये लग्न केले.

केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्याच्या कॉन्सर्टमध्ये लोक निकला जिजू म्हणून संबोधतात.

अलीकडेच निक जोनासने जिमी फॅलनच्या टॉक शो ‘द टुनाइट शो’मध्ये त्याला जिजू म्हणण्यामागची कारणे सांगितली आहेत.

 “मी प्रियांकाशी लग्न केले आणि त्यानंतर हा हॅशटॅग सुरू झाला.” असं निकने सांगितलं.

निक पुढे म्हणाला, “तेव्हापासून मी नॅशनल ‘जिजू’ झालो. जिजू म्हणजे मोठ्या बहिणीचा नवरा, म्हणून मी भारताचा मोठा भावोजी आहे.”

भारतात आयोजित जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टची क्लिपही प्ले केली होती, ज्यामध्ये जो जोनास आणि केविन जोनास यांनी निक जोनासची ओळख ‘जीजू’ म्हणून करून दिली होती.

लग्नाच्या चार वर्षानंतर, या जोडप्याने सरोगसीद्वारे 15 जानेवारी 2022 रोजी मालती मेरीला जन्म दिला.