पावसाळ्यात चिकटपणा टाळण्यासाठी अशी घ्या स्वतःची काळजी

प्रत्येक ऋतूनुसार आपल्या सगळ्यांनाच दैनंदिन जीवनात बदल करावे लागतात.

पावसाळा कडक उष्णतेपासून आराम देत असला तरीही या ऋतू आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढते. ज्यामुळे अस्वस्थता, चिकटपणा जाणवू लागतो.

पावसाळ्यात चिकटपणा टाळण्यासाठी पुढील पाच उपाय तुम्ही नक्की करून पाहा.

हवेतील ओलावा फॅब्रिकमध्ये जाऊ शकतो आणि तुम्हाला घाम येऊ शकतो. त्यामुळे कापसारखे मऊ हलके कपडे घाला.

हलके कपडे घाला

त्वरीत त्वचेत शोषले जाणारे हलके मॉइश्चरायझर वापरा. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी, त्वचेची छिद्रे उघडण्यासाठी वारंवार एक्सफोलिएट करा.

स्किनकेअर 

आर्द्रतेमुळे केसांमध्ये कोंडा वाढू शकतो ; ज्यामुळे टाळूला खाज येऊ शकते. टाळू स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी आपले केस वारंवार धुवा. 

केस वारंवार धुवा

पाणी आणि इतर द्रव पदार्थ भरपूर प्या. कारण हायड्रेटेड राहिल्याने शरीर थंड होण्यास आणि उष्णतेचा सामना करण्यास मदत होते.

हायड्रेटेड रहा

बॅक्टेरियाची वाढ व त्वचेची जळजळ टाळण्यासाठी धुतलेले व स्वछ कपडे घाला. ते तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत करतील.

स्वच्छता राखणे

मुसळधार पावसामुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ विस्कळीत