पावसाळ्यात पालकाची भाजी करताना घ्या ‘ही’ काळजी

पालक ही भाजी जीवनशक्तीचे मूलस्रोत आहे.

आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे.

पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे.

‘अ’ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात.

अतिपाणी घालून पालक भाजी शिजवू नये तसेच भाजी शिजल्यानंतर ते पाणी फेकून देऊ नये.

पालकाची भाजी स्वच्छ धुऊन पानांमध्ये जेवढे पाणी शिल्लक राहील तेवढेच पाणी भाजी शिजवताना वापरावे.

पावसाळ्यामध्ये पालकाच्या भाजीवर कीड पडते तसेच पालक हा वात प्रकोपक असल्याने सहसा पावसाळ्यात पालक भाजी खाऊ नये

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटात! पाहा मनमोहक छायाचित्रे