'हातपाय थांबले, दादा विसावले'  चला जाणून घेऊया कामाचा माणूस  असलेल्या अजित पवारांबद्दल थोडी माहिती

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाला आणि हे वृत्त संपूर्ण राज्याला हादरवून गेलं.

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्हा येथे झाला.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी हे त्यांचे मूळगाव आहे.

अजित पवार यांचं शिक्षण बी.कॉम पर्यंत झाले आहे.

राजकारणातील 'दादा' माणूस आणि सर्वांच्याच हक्काचा नेता अशी ओळख अजित पवार यांची होती

गावखेडं असो वा आणखी काही कधीही आणि कुठेही जातीपातिचं राजकारण न करणारा नेता अशी ओळख असणाऱ्या अजित पवारांच्या जनसेवेचा व्यास प्रचंड मोठा होता 

कोणाला शेतजमिनीच्या वादावर तोडगा काढून देण्यात, तर अगदी कोणाला नव्या व्यवसायासाठी मदत करण्याच्या निवेदनांना अंतिम उत्तर देत निकाली काढायचे ते म्हणजे अजित अनंतराव पवार. 

अजित पवारांना लहानथोर सारेच,'अजितदादा' असं हक्कानं संबोधायचे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात 1982 पासून सक्रिय असणाऱ्या अजित पवारांनी त्यांच्या वाटेला आलेल्या प्रत्येक जबबादारीला कायमच 100 टक्के न्याय देण्यास प्राधान्य दिलं. 

अनेकांचाच पोशिंदा असणारे हे राजामाणूस आपल्यात नाही, अशी हळहळ फक्त बारामतीच नाही तर सबंध महाराष्ट्रातून व्यक्त केली जात आहे.

आज बारामती आणि काटेवाडीमध्ये 'अजितदादा अमर रहे', 'परत या परत अजित दादा परत या', 'एकच वादा, अजित दादा', अशा घोषणांनी परिसर दणाणला. 

'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा नवीन फोटोशूट तुम्ही पहिला आहे का ?