दिवाळीत गोड,खारट असे अनेक पदार्थ तयार केले जातात आणिअशा चविष्ट पदार्थांना पाहून खाण्यपासुन स्वतःला रोखणे फार कठीण असते.
घेतलेल्या अतिरिक्त कॅलरीज पुन्हा संतुलित करता याव्यात यासाठी सणांनंतर बॉडी डिटॉक्सला खूप महत्त्व आहे.
दिवाळीत जंक फूड खाल्ल्यानंतर शरीर कसे डिटॉक्स करावे ते जाणून घेऊया.
सणांच्या दरम्यान आणि नंतर दररोज एक ते दोन कप ग्रीन टी प्या,त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
"ग्रीन टी"
हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, मिनरल्स आणि अँटि-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे जास्त खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात.
"ग्रीन स्मूदी"
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात, जे तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. याच्या सेवनाने तुमची पचनक्रिया सुधारते.
"लिंबू पाणी"
जेव्हा तुम्ही सणांच्या काळात जास्त जंक फूड खाता तेव्हा सॅलड अवश्य खा.सॅलडमध्ये काकडी, टोमॅटो, बीटरूट, गाजर घ्या,याने शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात.
"सॅलड"
सणांमध्ये तुम्ही खुप मिठाई खाल्ली असेल तर त्यानंतर तुमच्या आहारात फळांचा समावेश करा.फळांमध्ये नैसर्गिक साखर असते.फळे बॉडी डिटॉक्सचेही काम करतात.
"फळे"
पिण्याचे पाणी तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चयापचय देखील सुधारते.