लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता ई-केवायसी प्रक्रिया करावी लागणार आहे

दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया करण्यास राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने त्याचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करा

त्यानंतर लाभार्थ्याच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करावे.

यानंतर प्रणाली तपासेल की सदर लाभार्थ्याची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “ई- केवायसी आधीच पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.

जर ही प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.

त्यानंतर लाभार्थ्याला त्याचा जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि दिलेल्या बाबी प्रमाणित कराव्या लागतील

यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅप्चा कोड नमूद करावा. संमती दर्शवून सेंड ओटीपीवर क्लिक करावे. ओटीपी संबंधित मोबाईलवर आल्यावर तो नमूद करून सबमिट बटणावर क्लिक करावे.

माझ्या कुटुंबातील सदस्य राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत अथवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

या बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे आणि सबमिट बटण दाबावे

शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.

शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.