मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख-समृद्धी, शांती आणि धन-धान्य नांदते अशी मान्यता आहे.

या दिवशी 'महालक्ष्मी व्रत कथा' वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. 

तुम्ही हे व्रत पहिल्यांदाच करणार असाल तर मार्गशीर्षातील गुरुवारची सविस्तर पूजाविधी जाणून घ्या.

या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाह्या-फुटाणे आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे.

पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. शक्य असल्यास पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रे परिधान करावी.

घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूजागृहात चौरंग किंवा पाट मांडा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा.

एका कलशात पाणी घेऊन त्यात नाणे, सुपारी आणि हळद-कुंकू घाला. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवा आणि त्यावर श्रीफळ ठेवा.

चौरंगावर कलशाखाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर कलश स्थापित करा. कलशाच्या पुढे किंवा बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा.

चौरंगाभोवती आणि समोर रांगोळी काढा. कलशावर हळद-कुंकू आणि अक्षता वाहा. कलशाची वस्त्रमाळ घाला आणि फुलांनी सजावट करा.

देवीला हळद-कुंकू, अक्षता, फुले, अत्तर, वस्त्रासाठी कापूस अर्पण करा. विड्याच्या पानांवर सुपारी आणि दक्षिणा ठेवून अर्पण करा.

तुपाचे किंवा तेलाचे निरांजन/दीप प्रज्वलित करा.

'मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा' वाचा किंवा श्रवण करा. कथेचे वाचन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे.

पुरणपोळी, शिरा, फळे आणि लाह्या-फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा. नंतर माता लक्ष्मीची आरती करून कुटुंबासह प्रसाद ग्रहण करा.

आवळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया आवळा खाण्याचे फायदे...