पॅनिक अटॅकमध्ये अनेकदा काही लोकांना अगदी हृदयविकाराचा झटका आल्यासारखे जाणवते.
एखाद्या गोष्टीची खूप भिती वाटते, तेव्हा पॅनिक अटॅक येऊ शकतो आणि मनातील भिती हळूहळू वाढू शकते.
छातीत दुखणे, हृदय गती वाढणे, श्वास घेण्यात अडचण, थरथरणे, थंडी वाजून येणे, मळमळ ही सर्व पॅनिक अटॅकची लक्षण आहेत
पॅनिक अटॅक आल्यावर रुग्णांसोबत शांत रहा, त्यांना काय हवे ते विचारा त्यांना स्वतःला दीर्घ श्वास घेण्यास सांगा लक्षणे गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा