१९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरता आले नव्हते.
त्यावेळी भारतीय संघाच्या खेळाडूंची भेट घेऊन पंतप्रधान मोदींनी सांत्वन केले होते.
भारतीय संघाने काही महिन्यातच २९ जून २०२४ रोजी १७ वर्षांनंतर आयसीसीचा टी-२० विश्वचषक जिंकला. हा विश्वचषक जिंकून भारतीय संघाने संपूर्ण देशाला विजयाचा आनंद दिला.
आज ४ जुलै रोजी क्रिकेट संघ बार्बाडोसहून भारतात परतल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली.
पराभवाचे मळभ झटकून टाकत पुन्हा नव्या उमेदीने उभे राहत विजय मिळविणाऱ्या संघाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींना क्रमांक १ ची ‘नमो’ या नावाची जर्सी प्रदान केली.
भारतीय संघाच्या मुंबईतील विजयी मिरवणुकीसाठी गुजरातहून बस आणल्यामुळे विरोधकांकडून टीका होत आहे.
अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंचा ‘मामेरु’ समारंभासाठी पारंपरिक गुजराती लूक