मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही, हे कसं शोधायचं?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोंव्हेबरला मतदान पार पडणार आहेत 

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहता येईल किंवा नसेल तर मतदार यादीत नोंदणी कशी कराल?

दरवेळी निवडणूक आयोगाकडून आपल्या याद्या अपडेट केल्या जातात. बऱ्याचदा मतदार यादीतून नाव गाळलं जाऊ शकतं. 

त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून घेणं गरजेच आहे. 

जर तुमचं नाव या यादीत नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार असाल तर 6 नंबर चा फॉर्म भरावा लागतो. 

पहिल्यांदाच अर्ज भरत असाल तर तुमच्या कडे पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड, पॅन कार्ड, लिव्हिंग सरटिफिकेट, रहिवासी दाखला आणि त्याच बरोबर रेशन कार्ड असावे लागते.

 ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी आपल्याला आपले कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने स्कॅन करून अपलोड करता येते 

पण जर 6 नंबर चा फॉर्म ऑनलाइन भरायची सुविधा नसेल. तर आपल्या मतदारसंघाच्या 'Electoral Registration Office'  मध्ये देखील भरता येतो.

 त्या नंतर आपले मतदान ओळखपत्र आपल्याला पोस्ट मार्फत पाठवण्यात येते.

निवडणुकीत मतदान केल्यावर बोटावर 'निळी शाई' का लावली जाते असा प्रश्न तुम्हाला ही पडतो का?