फिरायला जाताय आणि जास्त ओझं नकोय? 'हे' हॅक्स वापरून करा स्मार्ट पॅकिंग..
आकारमान कमी करण्यासाठी कॉम्प्रेशन पॅकिंग क्यूबचा वापर करा.
कपड्यांची निवड-सुती, लिनेन सारखे हलके, फिकट रंगाचे आणि सैल कपडे निवडा जे उष्ण हवामानात आरामदायी राहतील.
उन्हाळी सहलीसाठी सामानाची बांधणी करण्याच्या काही प्रभावी युक्त्या पुढील प्रमाणे आहेत
कपडे दुमडण्याऐवजी ते गोल गुंडाळा. यामुळे बॅगेत बरीच जागा वाचते आणि कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत.
कपडे, अंतर्वस्त्रे आणि इतर वस्तू वेगळ्या ठेवण्यासाठी पॅकिंग क्युब्स वापरा. यामुळे शोधणे सोपे होते
सनस्क्रीन, सनग्लासेस , आणि हॅट सर्वात वर ठेवा जेणेकरून ते सहज मिळतील.
पोहण्यासाठी जात असल्यास, ओले कपडे ठेवण्यासाठी वेगळी वॉटरप्रूफ पिशवी ठेवा. तसेच, चप्पल आणि बूट वेगळ्या पिशवीत ठेवा.
उष्माघात टाळण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स किंवा ORS आणि इतर आवश्यक औषधांची किट सोबत ठेवा.
उन्हाळ्यात जास्त जड कपड्यांची गरज नसते, त्यामुळे आवश्यक तेवढेच कपडे घ्या.