51 वर्षीय मराठमोळी अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर साडी नेसून फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचे फोटो नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. 

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी चित्रपटसृष्टी आणि छोट्या पडद्यावर आपल्या सशक्त अभिनयाने ओळखल्या जातात.

त्यांनी अनेक नाटके, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावरही त्या नेहमीच सक्रिय राहतात. 

पती अविनाश नारकर यांच्यासोबत त्या ट्रेंडिंग गाण्यांवर मजेदार रील्स बनवतात, ज्या त्यांच्या उत्स्फूर्त आणि जोमदार व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतात.

तरुण पिढीला देखील ऐश्वर्या नारकर यांची ही एनर्जी खूप आवडते. ऐश्वर्या नियमितपणे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

त्यांचे साडीप्रेम आणि सुंदर साड्यांचे कलेक्शन चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतं.

काही फोटोंमध्ये त्यांचा लूक बोल्ड वाटल्याच्या कमेंट्स आणि चर्चा होत असतात. 

त्या अनेकदा सुंदर साड्यांमध्ये फोटो पोस्ट करतात, ज्यामध्ये त्यांचा मराठमोळा आणि ग्रेसफुल अंदाज दिसून येतो.

साडीतील त्यांचे फोटोही चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरतात आणि सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही ऐश्वर्या नारकर आजही प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा टिकवून आहेत.

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली, होणारा नवरा आहे तरी कोण?