घटस्फोटानंतर पुन्हा हार्दिक पांड्या पुन्हा पडला आहे प्रेमात, तर चला जाणून घेऊया कोण आहे क्रिकेटरची गर्लफ्रेंड...
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.
नुकताच हार्दिकने त्याच्या नवीन प्रेमाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे.
नताशा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले.
अचानक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची घोषणा हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी केली.
आता नताशा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा हार्दिक पांड्या हा प्रेमात पडलाय.
नुकताच तो गर्लफ्रेंडसोबत विमानतळावर स्पॉट झाला तर त्याने थेट मालदीवमधील खास फोटोही शेअर केला.
ज्यामध्ये हार्दिक पांड्याची नवीन गर्लफ्रेंड मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा स्पष्ट दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा या सतत रंगताना दिसल्या. आता दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसतंय.
हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये तो काळा शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला दिसतोय, तर माहिका शर्मा ही पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये त्याच्यासोबत उभी दिसत आहे.
लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया