‘या’ चित्रपटामुळे आलोक नाथना मिळाला ‘संस्कारी बाबूजी’ टॅग!

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये संस्कारी बाबूजींची भुमिका साकारणारे अभिनेते आलोक नाथ यांचा आज वाढदिवस आहे.

दूरदर्शनच्या ‘रिश्ते नाते’ या मालिकेमधून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती.

1982 मध्ये त्यांनी 'गांधी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.

वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी ‘कयामत से कयामत’ या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारली होती.

अशा बऱ्याच ऑफर्समुळे बॉलिवूडमध्ये त्यांची इमेज ‘संस्कारी बाबूजी’ अशी झाली.

'हम साथ-साथ हैं', 'हम आपके है कौन', 'परदेस', 'मैने प्यार किया', 'विवाह' यांसारखे चित्रपट, तर 'सपना बाबुल का बिदाई','मैं रहने वाली महलों की','यहां मैं घर-घर खेली','बुनियाद' यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी वडिलांच्या भूमिका साकारल्या आहेत.

प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ