"मुलगी झाली हो ..."
अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता
संग्राम साळवी यांना कन्यारत्न प्राप्त झाली
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे खुशबू तावडे आणि संग्राम साळवी सध्या सोशल मीडिया वर खूप चर्चेत आहे .
सारं काही तिच्यासाठी फेम अभिनेत्री खुशबू तावडे काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली आहे .
प्रसिद्ध मालिकेतून निरोप घेताना सहकाऱ्यांच्या गोड आठवणी तिने शेअर केल्या.
ह्या लोकप्रिय जोडप्याने २०१८ साली लग्न केले. तर त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिला मुलगा झाला आणि २ ऑक्टोबरला त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
अभिनेत्रीने चिमुकल्या लेकीसोबत सुंदर फोटो शेअर केले आहेत. कॅप्शन देत, " राघवची लहान बहीण ‘राधी’ला भेटा" लेकीचं नाव जाहीर केलं.
'राधी' या नावाचा अर्थ असा की, यश आणि समाधान. राधी हे नाव अतिशय युनिक आणि नवं आहे.
खुशबुच्या लेकीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आदिती राव हैदरीचे साऊथ अभिनेता सिद्धार्थशी लग्न
Check it Out